Gold Prices: सोन्याने रचला नवा इतिहास; पहिल्यांदाच पार केला 70 हजारांचा टप्पा

Gold Record High: देशांतर्गत बाजारात सोन्याने प्रथमच 70 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला. आंतरराष्ट्रीय बाजारातही भविष्यात सोन्या-चांदीच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे.
Gold Prices
Gold PricesSakal

Gold Record High: देशांतर्गत बाजारात सोन्याने प्रथमच 70 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला. आंतरराष्ट्रीय बाजारातही भविष्यात सोन्या-चांदीच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोन्याने एमसीएक्सवर नवा इतिहास रचला. सोन्याच्या भावाने प्रथमच 70 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी ओलांडली आहे. शुक्रवारी सोन्याने प्रति 10 ग्रॅम 70,699 रुपयांचा नवा उच्चांक गाठला.

याआधी आठवडाभरात सोमवारी आणि बुधवारी सोन्याच्या भावाने नवीन विक्रम केला होता. दुसरीकडे, शुक्रवारी चांदीने प्रति किलो 81,030 रुपयांची पातळी गाठली. रॉयटर्सच्या अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात एका आठवड्यात सोन्याच्या भावात 3.8 टक्क्यांची वाढ झाली आहे.

भू-राजकीय तणावामुळे सोन्याची मागणी वाढत आहे

जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या वातावरणात, गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदी खरेदी करण्यास सुरुवात करतात. सध्या भू-राजकीय तणाव वाढला आहे. पश्चिम आशियामध्ये काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या युद्धावर कोणताही तोडगा निघत नाही. तसेच पूर्व युरोपात सुरू असलेले युद्धही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.

व्याजदर कमी होण्याचे संकेत

यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने या वर्षात तीन वेळा व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिले आहेत. जर फेडरल रिझर्व्हने व्याजदर कमी केले, तर अनेक मध्यवर्ती बँका त्याच्या पावलावर पाऊल टाकतील आणि व्याजदर कमी करण्याचा मार्ग स्वीकारतील. त्यामुळे सोन्या-चांदीची मागणीही वाढत आहे.

Gold Prices
RBI MPC: आरबीआयची मोठी घोषणा! बँकेत जाण्याची गरज नाही; आता UPI द्वारे ATM मध्ये पैसे होतील जमा

सोन्याची शुद्धता कशी ओळखायची:

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.(How to determine purity of gold

Gold Prices
JIO Customers : महाराष्ट्रात ‘जिओ’ची ग्राहकसंख्या सर्वाधिक ; ‘दूरसंचार नियामका’चा अहवाल

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात. ( What is the difference between 22 and 24 carats? )

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com