Gold Price 2024: सोन्यात गुंतवणूक करणारे या वर्षी होऊ शकतात मालामाल; काय आहे कारण?

Gold Price Target 2024: सोने हे गुंतवणुकीचे सर्वात सुरक्षित साधन मानले जाते. सोन्यात गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना फार कमी वेळात खूप जास्त परतावा मिळत आहे. लोकांनी आता या पिवळ्या धातूची अधिक खरेदी करावी का?
Gold Price Target 2024
Gold Price Target 2024Sakal

Gold Price Target 2024: सोने हे गुंतवणुकीचे सर्वात सुरक्षित साधन मानले जाते. सोन्यात गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना फार कमी वेळात खूप जास्त परतावा मिळत आहे. लोकांनी आता या पिवळ्या धातूची अधिक खरेदी करावी का? मोतीलाल ओसवाल यांना वाटते की सोन्याच्या किमतीत लवकरच मोठी वाढ होणार आहे.

2024 मध्ये आतापर्यंत मौल्यवान धातूमध्ये 14 टक्के वाढ झाली आहे आणि त्यात आणखी वेगाने वाढ होण्याची अपेक्षा आहे. ब्रोकरेजने सांगितले आहे की प्रत्येक 10 ग्रॅमवर ​​12,000 रुपये नफा होऊ शकतो. त्यात असे म्हटले आहे की सोन्याने वर्षाची सुरुवात स्थिर केली परंतु नंतरच्या काळात वाढीचा वेग लक्षणीय होता.

Gold Price Target 2024
Share Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार?

सोने किती वाढू शकते?

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, सोन्याने वर्षाची सुरुवात स्थिर केली, परंतु देशांतर्गत बाजारात सोन्याच्या भावात कमालीची वाढ झाली आहे, या वर्षी सोन्यात आतापर्यंत सुमारे 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वर्षी चांदीच्या दरात आश्चर्यकारक वाढ झाली आहे. ज्याने YTD आधारावर 27 टक्के वाढ नोंदवली आहे.

Gold Price Target 2024
Lok Sabha Exit Poll 2024: एक्झिट पोलचा शेअर बाजारावर होणार मोठा परिणाम; गेल्या 20 वर्षात काय घडलं होतं?

सोन्या-चांदीमध्ये परतावा किती?

एप्रिल 2024 मध्ये सोन्याने 8 टक्के परतावा दिला आहे तर चांदीने 6 टक्के परतावा दिला आहे. मार्च 2024 मध्ये सोन्यामध्ये 9 टक्के परतावा दिला होता तर चांदीने 6 टक्के परतावा दिला होता.

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे कमोडिटी रिसर्चचे ग्रुप सीनियर व्हीपी नवनीत दमानी म्हणाले की, भू-राजकीय तणावामुळे सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. याशिवाय, सेंट्रल बँकेकडून खरेदी तसेच सण आणि विवाहसोहळ्यांशी संबंधित देशांतर्गत मागणीमुळेही भाव वाढू शकतात.

Gold Price Target 2024
Gautam Adani: गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; संपत्तीत झाली 4,54,73,57,37,500 रुपयांची वाढ

नोंद - सोने-चांदी, क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com