Gold Rate Today : सोन्याच्या भावात दुसऱ्या दिवशीही वाढ,चांदीही चकाकली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Silver Rate India : गेल्या आठवड्यातील घसरणीनंतर गुंतवणूकदारांनी खरेदी वाढवल्याने सोन्या-चांदीच्या दरांना आधार मिळाला. कमकुवत डॉलरमुळे सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी वाढ नोंदवली गेली.
Gold rate today

Gold rate India

esakal

Updated on

Gold Silver Rate Today: गेल्या आठवड्यातील मोठ्या घसरणीनंतर गुंतवणूकदारांनी भाव कमी झाल्यावर खरेदी सुरू केल्याने सोने आणि चांदीच्या दरांना आधार मिळाला आहे. डॉलर कमकुवत झाल्याचा फायदा देखील या बाजाराला मिळाला. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ नोंदवली गेली. एक दिवस स्थिर राहिल्यानंतर देशाची राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याच्या (१० ग्रॅम) दरात दोन दिवसांत १८० रुपयांची तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात १६० रुपयांची वाढ झाली. मात्र, आजच्या आकडेवारीनुसार दिल्लीत दोन्ही प्रकारच्या सोन्याच्या दरात १० रुपयांची घट झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com