

Gold Rate And Silver Price Today: देशाची राजधानी दिल्लीत सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. सराफ बाजाराने सोन्याचे भाव जाहीर केले आहेत. सध्या सोन्याच्या भावात 1300 रुपयांची वाढ झाली असून चांदीच्या भावातही 1300 रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत.
सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ होण्याची मुख्य कारणे म्हणजे यूएस टॅरिफबाबत अनिश्चितता आणि फेडरल रिझर्व्हकडून चलनविषयक धोरण शिथिल करण्याच्या वाढत्या अपेक्षा. तज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत सोन्याच्या स्पॉट किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचे भाव लवकरच 1 लाखांपर्यंत पोहण्याची शक्यता आहे.