Gold Rate Today: सोन्याची चमक अजूनही कायम; चांदीनेही पार केला 74 हजारांचा टप्पा

Gold-Silver Rate Today 3 April 2024: आज सोन्याच्या भावात तेजी आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. सोने रोज नवीन विक्रमी उच्चांक गाठत आहे. सोमवारी नवीन उच्चांक गाठल्यानंतर सोन्याने आज बुधवारी नवा विक्रम केला आहे.
gold prices hits another record reaches new lifetime high Today 3 April 2024
gold prices hits another record reaches new lifetime high Today 3 April 2024 Sakal

Gold-Silver Rate Today 3 April 2024: आज सोन्याच्या भावात तेजी आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. सोने रोज नवीन विक्रमी उच्चांक गाठत आहे. सोमवारी नवीन उच्चांक गाठल्यानंतर सोन्याने आज बुधवारी नवा विक्रम केला आहे. आता सोन्याचा भाव 70 हजार रुपयांच्या पातळीपासून काही पावले दूर आहे.

सोन्याचा आजचा भाव काय आहे?

बुधवारी एमसीएक्सवर सोन्याचा भाव 70 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला आहे. आज चांदीचा भावही विक्रमी उच्चांकावर म्हणजेच 75,000 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. या आधी चांदीचा भाव 74,000 रुपये प्रति किलो होता.

 24 कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव? (24k Gold Rate Today)

  • मुंबई- 69,870 रुपये

  • पुणे - 69,870 रुपये

  • नागपूर - 69,870 रुपये

  • नाशिक - 69,900 रुपये

  • ठाणे - 69,870 रुपये

  • अमरावती - 69,870 रुपये

सोन्याची शुद्धता कशी ओळखायची:

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.(How to determine purity of gold)

gold prices hits another record reaches new lifetime high Today 3 April 2024
Reserve Bank of India : रेपोदर ‘जैसे थे’ राहण्याचा अंदाज ; महागाई नियंत्रणाला रिझर्व्ह बँकेचे प्राधान्य

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

gold prices hits another record reaches new lifetime high Today 3 April 2024
Maharashtra Revenue : ‘जीएसटी’ संकलनात महाराष्ट्र अव्वल ; ‘जीएसटी’ लागू झाल्यापासून प्रथम स्थान कायम

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात. ( What is the difference between 22 and 24 carats? )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com