Gold Price Today
esakal
गेल्या दहा दिवसांत सोने आणि चांदीच्या बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅममागे तब्बल ७ हजार ४०० रुपयांनी कमी झाला आहे. तर चांदीच्या दरातही प्रति किलो १५ हजार ९०० रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांचं या घसरणीकडे लक्ष लागलं आहे.