महिन्याभरात सोनं १८ हजारांनी, चांदी ६२ हजारांनी स्वस्त! लग्नसराईत खरेदीची हीच योग्य वेळ?

Why Gold-Silver Price Crash : २० नोव्हेंबरपासून देवउठनी एकादशीच्या मुहूर्तावर लग्नसराईला सुरुवात होत आहे. त्यामुळे लग्नासाठी दागिने खरेदी करणाऱ्यांसमोर सध्याच्या दरात खरेदी करावी की आणखी वाट बघावी, असा प्रश्न आहे.
Why Gold-Silver Price Crash

Why Gold-Silver Price Crash

esakal

Updated on: 

गेल्या महिन्याभरात ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण या काळात सोन्याच्या दरात तब्बल १८ हजार १६० रुपयांची, तर चांदीच्या भावात ६२ हजार ७७० रुपयांची घसरण झाली आहे. १९ ऑक्टोबरला १ लाख ४७ हजार रुपयांच्या पुढे असलेलं २४ कॅरेट सोनं आता १ लाख २९ हजार रुपयांच्या आसपास आलं आहे. तर चांदीचा भावही २ लाख १२ हजारांवरून थेट १ लाख ५० हजार रुपयांवर आला आहे.

Loading content, please wait...