Gold Silver Price : सोन्याच्या दरात घसरण सुरूच, खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

आजही सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे.
Gold Silver Price
Gold Silver Pricesakal

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत होती मात्र या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोने चांदीच्या दरात घसरण दिसून आली तर आजही सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. अक्षय्य तृतीयाच्या पार्श्वभूमीवर ही घसरण विशेष लक्षवेधी आहे.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,930 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,020 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 785 रूपये आहे. (Gold Silver Price update 18 April 2023)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 61,630 रुपये

दिल्ली - 61,170 रुपये

हैदराबाद - 61,020 रुपये

कोलकत्ता - 61,020 रुपये

लखनऊ - 61,170 रुपये

मुंबई - 61,020 रुपये

नागपूर - 61,020 रुपये

पुणे - 61,020 रुपये

Gold Silver Price
Gold Silver Price : अक्षय्य तृतीयाच्या पार्श्वभूमीवर सोनं चक्क 600 रुपयांनी महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

नवा नियम

केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या नियमांमध्ये बदल करताना 1 एप्रिल 2023 पासून कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांवर 6-अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असणे आवश्यक आहे.

मार्चमध्ये माहिती देताना भारतीय मानक ब्युरो (BIS) ने म्हटले होते की, नवीन आर्थिक वर्षात कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याचे दागिने विकू शकणार नाही.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Gold Silver Price
Gold Investment: सोने-चांदीच्या गुंतवणूकीतून Share Market पेक्षा जास्त फायदा, जाणून घ्या

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com