Google Employee: गुगलचा कर्मचारी सोडत होता नोकरी, थांबवण्यासाठी कंपनीने वाढवला 300 टक्के पगार

Google Employee: जरा विचार करा. तुम्ही तुमच्या कंपनीचा राजीनामा देऊन दुसऱ्या कंपनीत जाण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या कंपनीच्या बॉसला हे कळले तर काय होईल? तुम्हाला वाटेल की बॉस चिडेल आणि तो तुमच्याशी चांगले वर्तन करणार नाही
Google offered 300 percent salary hike to stop an employee from joining a different company ras98
Google offered 300 percent salary hike to stop an employee from joining a different company ras98Sakal

Google Employee: जरा विचार करा. तुम्ही तुमच्या कंपनीचा राजीनामा देऊन दुसऱ्या कंपनीत जाण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या कंपनीच्या बॉसला हे कळले तर काय होईल? तुम्हाला वाटेल की बॉस चिडेल आणि तो तुमच्याशी चांगले वर्तन करणार नाही, परंतु Google कर्मचाऱ्यासोबत वेगळचं घडल आहे. (Google offered 300 percent salary hike to stop an employee from joining a different company)

गुगलने कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याला जास्त पगार दिला. कर्मचाऱ्याला जेवढे वेतन मिळत होते त्यापेक्षा चारपट पगार जास्त दिला, जेणेकरून त्याला कंपनीत कायम ठेवता येईल.

अमेरिकेतील एका स्टार्टअपच्या सीईओने गुगलबाबत हा खुलासा केला आहे. स्टार्टअप कंपनीच्या सीईओने सांगितले की, कर्मचारी कपात होत असतानाच्या काळात गुगलने नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पगारात चौपट वाढ केली.

पर्पलेक्सिटी एआय स्टार्टअपचे सीईओ अरविंद श्रीनिवास यांनी ॲलेक्स कॅन्ट्रोविट्झद्वारे होस्ट केलेल्या बिग टेक्नॉलॉजी पॉडकास्ट शोवर खुलासा केला. IIT मद्रासचे अरविंद श्रीनिवास यांनी सांगितले की त्यांनी अलीकडेच त्यांच्या Perplexity AI स्टार्टअपसाठी Google कर्मचारी नियुक्त करण्याचा प्रयत्न केला होता. (Google Offers 300% Salary Hike To Stop An Employee From Joining Rival AI Company Headed By IIT-Madras Alumni)

त्यांनी सांगितले की आमच्याशी बोलल्यानंतर, Google कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसशी संपर्क साधला जेणेकरून तो नोकरी सोडण्याची नोटीस देऊ शकेल. मात्र कर्मचाऱ्याची नोटीस किंवा राजीनामा स्वीकारण्याऐवजी गुगलने त्याला मोठी ऑफर देऊन थांबवले. श्रीनिवास यांनी सांगितले की, गुगलने त्या कर्मचाऱ्याचा पगार 300 टक्क्यांनी वाढवला.

Google offered 300 percent salary hike to stop an employee from joining a different company ras98
Tesla Power India: टेस्ला पॉवर इंडिया 2,000हून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करणार; कोणत्या क्षेत्रांमध्ये मिळणार नोकऱ्या?

अरविंद श्रीनिवास यांनी सांगितले की कर्मचारी अजूनही तिथे काम करत आहे. म्हणजे त्याने गुगलची 300 टक्के पगारवाढ मान्य केली आहे. श्रीनिवास यांनी त्या कर्मचाऱ्याचा तपशील उघड केला नसला तरी, गुगल आपल्या चांगल्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी खूप प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

एकीकडे गुगलने गेल्या दीड महिन्यात 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे, तर दुसरीकडे एका कर्मचाऱ्याला कामावर कायम ठेवण्यासाठी 4 पट पगार देऊ केला आहे. अरविंद म्हणाले की, ज्यांचा पगार खूप जास्त आहे, पण ते तेवढे आउटपुट देत नाहीत, अशा लोकांना गुगल कामावरून काढून टाकत आहे.

Google offered 300 percent salary hike to stop an employee from joining a different company ras98
CIBIL Score: उद्योग मंत्री नारायण राणे ट्रोल होत असलेला सिबिल स्कोर नेमका काय आहे? तुम्हाला माहितेय का?

गुगल कंपनी कर्मचारी कपात करत असली तरीही ते चांगल्या कर्मचाऱ्याला जाऊ देत नाही. त्यामुळे गुगल अतिशय स्मार्ट पद्धतीने कर्मचारी कपात करत आहे, जेणेकरुन फक्त तेच लोक काढून टाकले जातील ज्यांची कंपनीला गरज नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com