

Google AI Contract: 'तुम्ही माझ्यासाठी काम करा किंवा करु नका, पण मी दुसऱ्यासाठी काम करू देणार नाही.' जगातील आघाडीची टेक कंपनी गुगल, आजकाल याच धोरणावर काम करत आहे. कंपनी त्यांच्या अनेक कर्मचाऱ्यांना वर्षभर घरी बसून फुकट पगार देत आहे.
कंपनी या कर्मचाऱ्यांकडून कोणतेही काम करुन घेत नाही आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी जाण्याची परवानगीही देत नाही. यासाठी कंपनीने करार देखील केला आहे. कर्मचारी मोफत पगार घेत असले तरी त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.