Google Pay: आता गुगल पेवरुन घ्या सॅशे लोन, अगदी 111 रुपयांच्या हफ्त्यासह करु शकता परतफेड

Google Pay: व्यापाऱ्यांना अनेकदा छोटी कर्जे आणि अधिक सोप्या परतफेड पर्यायांची आवश्यकता असते.
Google To Provide Sachet Loans On Google Pay App
Google To Provide Sachet Loans On Google Pay App Esakal

Google Pay: गुगल इंडियाने छोट्या व्यापाऱ्यांना लक्षात घेऊन छोट्या कर्जाची सुविधा सुरू केली आहे. आता छोटे व्यापारी गुगल पेवरून (Google Pay) 15,000 रुपयांचे कर्ज घेऊ शकतात आणि ते 111 रुपयांच्या छोट्या हप्त्यांमध्येही परतफेड करू शकतात. याबाबत गुगल पेने डीएमआय फायनान्ससह पार्टनरशिप केली आहे.

व्यापाऱ्यांना अनेकदा छोटी कर्जे आणि अधिक सोप्या परतफेड पर्यायांची आवश्यकता असते. त्यांच्या याच गरजा पूर्ण करण्यासाठी, डीए फायनान्ससोबत गुगल पेवर 15,000 इतके कमी कर्ज देण्याची सोय उपलब्ध केली आहे आणि ते 111 रुपये इतके कमी हप्त्यांसह पेमेंट करू शकतात अशी माहितीही त्यांनी दिली.

Google To Provide Sachet Loans On Google Pay App
Diamond Market: आता मुंबईतील डायमंड मार्केटही गुजरातला जाणार; राज्याला होणार 'इतक्या' कोटींचे नुकसान

सॅशे लोन ही एक प्रकारची नॅनो-क्रेडिट किंवा खूप छोटी कर्जे आहेत, जी तुम्हाला खूप कमी कालावधीसाठी मिळतात. सहसा हे प्री-अप्रूव्ड असतात आणि तुम्हाला हे कर्ज लगेच मिळते.

Google To Provide Sachet Loans On Google Pay App
Cello World IPO: 30 ऑक्टोबरला येतोय सेलो वर्ल्ड लिमिटेडचा आयपीओ; संपूर्ण माहिती एका क्लिकवर

परतफेड करणे देखील सोपे आहे. ही कर्जे 10,000 रुपयांपासून सुरू होतात आणि त्यांचा कालावधी 7 महिने ते 12 महिन्यांपर्यंत असू शकतो. सॅशे लोन मिळवण्यासाठी तुम्हाला एकतर लोन ऍप डाउनलोड करावे लागेल. तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता, आणि व्हेरिफिकेशन प्रोसेसही सोपी आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com