
थोडक्यात:
केंद्र सरकार EPF खात्यातील रक्कम प्रत्येक 10 वर्षांनी काढण्याची मुभा देण्याचा विचार करत आहे.
या नव्या प्रस्तावामुळे 30-40 वयातही EPFमधून निधी काढणे शक्य होणार, पण कदाचित काही मर्यादा लागू होतील.
तज्ज्ञांनी रिटायरमेंट सुरक्षा आणि IT सिस्टमवर येणारा ताण याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
EPF Withdrawal Rules May Change: केंद्र सरकार कर्मचारी भविष्य निधी (EPF) संदर्भात मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. आता EPF खातेदारांना आपल्या खात्यातील रक्कम प्रत्येक दहा वर्षांनी मोठ्या प्रमाणात किंवा संपूर्णपणे काढण्याची मुभा मिळू शकते. म्हणजेच, रिटायरमेंटपर्यंत वाट पाहण्याची गरज नसेल, अशी शक्यता आहे.