
भारतीय पोस्ट विभागाची ग्राम सुरक्षा योजना ग्रामीण आणि निमशहरी लोकांसाठी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे.
फक्त रोज ₹50 (महिन्याला ₹1500) भरून मुदतीनंतर तब्बल ₹35 लाखांपर्यंत फंड मिळू शकतो.
या योजनेत कर्ज, डेथ बेनिफिट आणि बोनस यांसारखे फायदे देखील उपलब्ध आहेत.
Gram Suraksha Yojana: सुरक्षित आणि जोखीममुक्त गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर भारतीय पोस्ट विभागाची ग्राम सुरक्षा योजना (Gram Suraksha Yojana) तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील नागरिकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या योजनेत कमी उत्पन्न असलेले लोकही दीर्घकाळात मोठा फंड तयार करू शकतात. या योजनेची खासियत अशी की, दररोज फक्त 50 रुपयांच्या (म्हणजे महिन्याला ₹1500) गुंतवणुकीवर सुमारे 35 लाखांपर्यंतचा फंड तयार करु शकता.