Moody's Analytics : मूडीजचा भारताला धोक्याचा इशारा; रुपया स्थिर केला नाहीतर...| Greater Risk Of Rupee Weakness RBI Could Press Hard On Brakes Moody's Analytics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Moody's Analytics

Moody's Analytics : मूडीजचा भारताला धोक्याचा इशारा; रुपया स्थिर केला नाहीतर...

Moody's Analytics : आशियातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांबाबत मूडीज अॅनालिटिक्सने मोठा दावा केला आहे. मूडीजने म्हटले आहे की आशियातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील कमकुवतपणाचा धोका हा चिंतेचा विषय आहे. सर्वात मोठा धोका भारतावर आहे.

रुपया आणि इतर चलने अशीच कमकुवत होत राहिल्यास वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होईल. (Greater Risk Of Rupee Weakness RBI Could Press Hard On Brakes Moody's Analytics)

मूडीजच्या मते, कमकुवत होणारा रुपया आशियातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या भारतावर ब्रेक लावू शकतो. भारतीय रुपया जवळजवळ एक वर्ष अस्थिर होता आणि प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलर मजबूत झाला आहे.

ऑक्टोबर 2022 मध्ये, रुपयाने इतिहासात प्रथमच 83 चा टप्पा ओलांडला. आता एका डॉलरची किंमत 82 रुपये आहे.

जर रुपयाची स्थिती मजबूत झाली नाही तर आरबीआयला मोठे निर्णय घेणे भाग पडू शकते, असेही मूडीजने म्हटले आहे. कमजोर रुपया आणखी कमकुवत होऊ नये म्हणून दर वाढवावे लागतील.

अहवालात आणखी काय म्हटले आहे?

अहवालात भारताच्या महागाईचाही उल्लेख करण्यात आला आहे. यापुढे वाढ होणार नाही असे म्हटले जात आहे, परंतु खाद्यपदार्थांच्या वाढत्या किंमती ही एक प्रमुख चिंता आहे.

फेब्रुवारीमध्येच रिझर्व्ह बँकेने गेल्या 10 महिन्यांत सलग सहाव्यांदा रेपो दर वाढवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे कर्जाचे व्याजदर वाढले.

8 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या पतधोरण बैठकीत RBI ने पुन्हा रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवला. गेल्या वर्षी मे महिन्यापासून मध्यवर्ती बँकेने सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. यापूर्वी आरबीआयने डिसेंबर 2022 मध्ये रेपो दरात 35 आधार अंकांची वाढ केली होती.

आता ताज्या वाढीनंतर रेपो दर 6.5 टक्के झाला आहे. मुडीजचा दावा आहे की जर रुपयाची कमजोरी अशीच राहिली तर आरबीआय पुढील महिन्यात म्हणजे एप्रिलमध्येही रेपो दर वाढवू शकते.