
जीएसटी परिषदेने कर सुधारणा करत 12% आणि 28% स्लॅब रद्द करून फक्त 5% आणि 18% असे दोन स्लॅब ठेवले आहेत.
रोजच्या वापराच्या वस्तू, विमा, आरोग्य सेवा, शिक्षण साहित्य आणि शेतीवरील कर कमी झाल्याने जीवन खर्च कमी होणार आहे.
22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणाऱ्या या सुधारण्यामुळे ग्राहक, शेतकरी, महिला आणि लघु उद्योगांना थेट फायदा होईल.
GST Meeting Updates: केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा करात (GST) मोठा बदल केला आहे. जीएसटी परिषदेच्या दोन दिवस चाललेल्या बैठकीत मोठे निर्णय घेतले गेले. आतापर्यंतच्या चार जीएसटी स्लॅब्सपैकी दोन स्लॅब रद्द करून आता फक्त 5% आणि 18% असे दोनच स्लॅब ठेवण्यात आले आहेत. 12% आणि 28% स्लॅब्स इतिहासजमा झाले आहेत. हा नवा सुधारित जीएसटी 22 सप्टेंबर 2025 पासून देशभर लागू होणार आहे. सरकारने याला "नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म" असं नाव दिलं असून, याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत आणि नोकरदारांपासून लघु उद्योगांपर्यंत होणार आहे.