H1 B Visa : ८८ लाख दरवर्षी भरायचे? कुणाला अन् कधीपासून नवे नियम लागू? अमेरिकेनं दिलं स्पष्टीकरण, व्हिसाधारकांना मोठा दिलासा

H1 B Visa : एच१ बी व्हिसासाठी आता १ लाख डॉलर म्हणजेच ८८ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर सध्याच्या व्हिसाधारकांसह नव्याने व्हिसा घेण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना मोठा धक्का बसला होता.
H1B Visa Shock Eased US Announces Which Applicants Must Pay 88 Lakh New Fee

H1B Visa Shock Eased US Announces Which Applicants Must Pay 88 Lakh New Fee

Esakal

Updated on

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच१ बी व्हिसा धारकांवर शुल्कात मोठी वाढ केलीय. यापूर्वी १० हजार डॉलर्समध्ये एच१ बी व्हिसा मिळायचा पण त्यासाठी आता १ लाख डॉलर म्हणजेच ८८ लाख रुपये मोजावे लागणार आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर सध्याच्या व्हिसाधारकांसह नव्याने व्हिसा घेण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना मोठा धक्का बसला होता. दरम्यान, व्हाइट हाऊस प्रेस सचिव कॅरोलीन लेविट यांनी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. ८८ लाख रुपये दरवर्षी द्यावे लागणार नाहीत. ही वन टाइम फी असून फक्त नव्या व्हिसा धारकांनाच लागू असेल असं स्पष्ट करण्यात आलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com