
एचडीएफसी बँक 22 ऑगस्ट रात्री 11 ते 23 ऑगस्ट सकाळी 6 या वेळेत 7 तास काही सेवा बंद ठेवणार आहे.
या दरम्यान फोन बँकिंग IVR, व्हॉट्सअॅप चॅट बँकिंग आणि SMS बँकिंग उपलब्ध राहणार नाहीत.
नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग अॅप, पेयझॅप आणि मायकार्ड्स सेवा मात्र सुरू राहतील.
HDFC Bank Alert: जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बँकेने जाहीर केले आहे की 22 ऑगस्टच्या रात्री 11 वाजल्यापासून 23 ऑगस्टच्या सकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल 7 तास काही सेवा बंद राहतील. हा निर्णय बँकेने सिस्टमच्या देखभालीसाठी (मेंटेनन्स) घेतला आहे, जेणेकरून आगामी काळात सेवा अधिक जलद आणि सुरळीत दिल्या जाऊ शकतील.