Income Tax Return: फॉर्म-16 शिवाय IT Return भरता येईल का? काय आहे नियम जाणून घ्या

प्राप्तिकर भरण्यासाठी फॉर्म 16 हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
Income Tax Return
Income Tax ReturnSakal

How to File ITR Without Form 16: आर्थिक वर्ष 2023-24 सुरू झाले आहे. आता आयकर विवरणपत्र भरण्याची वेळ पुन्हा आली आहे. पगारदार वर्ग भारतात आयटीआर फाइल करण्यासाठी फॉर्म 16 वापरतो, परंत अनेक लोक फॉर्म 16 शिवाय देखील आयकर रिटर्न भरतात.

फॉर्म 16 हा असा दस्तऐवज आहे ज्याद्वारे कर्मचाऱ्याच्या संपूर्ण करपात्र उत्पन्नाचा हिशेब मिळू शकतो. काही कर्मचाऱ्यांचे वेतन करपात्र उत्पन्नात येत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

अशा परिस्थितीत कंपनी त्यांच्यासाठी फॉर्म 16 जारी करत नाही. या प्रकरणात, तुम्ही फॉर्म 16 शिवाय देखील ITR दाखल करू शकता.

फॉर्म 16 काय आहे?

प्राप्तिकर भरण्यासाठी फॉर्म 16 हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. या दस्तऐवजात, व्यक्तीच्या संपूर्ण उत्पन्नाचा हिशेब ठेवला जातो. यावरून त्या व्यक्तीने एकूण किती पैसे खर्च केले हे कळते.

आर्थिक वर्षात किती कर कापला गेला आणि टीडीएसची माहितीही मिळते. यामध्ये तुमच्या गुंतवणुकीची माहितीही नोंदवली जाते.

ITR फॉर्म 26AS द्वारे दाखल करता येईल :

तुमच्याकडे फॉर्म 16 नसल्यास, तुम्ही फॉर्म 26AS द्वारे तुमच्या TDS आणि TCS बद्दल माहिती मिळवू शकता. या फॉर्ममध्ये, व्यक्तीच्या आगाऊ कर आणि उच्च मूल्याच्या व्यवहारांची माहिती मिळते.

याशिवाय, तुमच्याकडे सॅलरी स्लिप, एचआरए स्लिप, आयकर कलम 80C आणि 80D अंतर्गत गुंतवणुकीचा पुरावा यासोबतच तुम्हाला तुमच्या गृहकर्जाचा पुरावाही जमा करावा लागतो. यानंतर तुम्ही फॉर्म 16 शिवाय सहजपणे इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता.

Income Tax Return
Cryptocurrency Market: निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोबद्दल दिला इशारा; म्हणाल्या, अर्थव्यवस्थेचे...

फॉर्म 26AS- कसा डाउनलोड करावा?

  • जर तुमचा पगार आयकर अंतर्गत येत नसेल परंतु तुम्हाला ITR फाइल करायचा असेल तर तुम्ही प्राप्तिकर वेबसाइटवरून फॉर्म 26AS डाउनलोड करू शकता.

  • यासाठी https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या ई-फाइल पोर्टलवर क्लिक करा.

  • पुढे तुम्हाला My Account हा पर्याय दिसेल, View Form 26AS लिंकवर क्लिक करा.

  • यानंतर, त्यात मूल्यांकन वर्ष निवडा आणि View Time वर क्लिक करा.

  • त्यानंतर डाउनलोड पर्यायावर क्लिक करा आणि हा फॉर्म डाउनलोड होईल.

Income Tax Return
पाठ्यपुस्तकांत वह्यांची घुसखोरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com