Noel Tata's Zudio BrandSakal
Personal Finance
Zudio Success: झुडिओ कसं झालं सुपरहिट? टाटांच्या सावत्र भावाने सांगितलं यशाचं सिक्रेट
Noel Tata's Zudio Brand: जागतिकीकरणानंतर भारतीय लोकांची फॅशन सतत बदल आहे. एकेकाळी झारा आणि H&M सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे भारताच्या फॅशन मार्केटवर वर्चस्व होते. पण आता भारतीय कंपन्याही या मार्केटमध्ये उतरल्या आहेत.
Noel Tata's Zudio Brand: जागतिकीकरणानंतर भारतीय लोकांची फॅशन सतत बदल आहे. एकेकाळी झारा आणि H&M सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे भारताच्या फॅशन मार्केटवर वर्चस्व होते. पण आता भारतीय कंपन्याही या मार्केटमध्ये उतरल्या आहेत. यात सर्वात मोठा वाटा टाटांच्या झुडिओचा आहे.
2016 मध्ये टाटा समूहाने झुडिओ नावाचा स्वदेशी ब्रँड लॉन्च केला. ज्यामुळे ट्रेंडी कपडे सर्वसामान्यांना सहज उपलब्ध झाले. झुडिओने खासकरून टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये कंपनीचा विस्तार केला आहे.

