

Petrol-Diesel
esakal
देशातील तीन प्रमुख सरकारी तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसीएल) यांना आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागू शकते. विविध ब्रोकरेज कंपन्यांच्या अंदाजानुसार, या तिन्ही कंपन्यांचा एकत्रित EBITDA तोटा सुमारे ४७,७०० कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, एलपीजीवरील वाढती अंडर-रिकव्हरी, रुपयाचे अवमूल्यन आणि पेट्रोल-डिझेल विक्रीतील घटलेले मार्जिन यामुळे कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढल्याचे सांगितले जात आहे.