General Insurance : आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स लि. ही विमा कंपनी प्रवास, घर, आरोग्य; तसेच वाहन आदी विविध प्रकारचे विमा संरक्षण देते.
General Insurance
General Insurance sakal

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स लि. ही विमा कंपनी प्रवास, घर, आरोग्य; तसेच वाहन आदी विविध प्रकारचे विमा संरक्षण देते. ही कंपनी देशातील सर्वांत मोठी खासगी क्षेत्रातील नॉन-लाइफ इन्शुरन्स कंपनी आहे, तर सर्वसाधारण विमा क्षेत्रातील ही दुसरी सर्वांत मोठी कंपनी आहे.

गेल्या बुधवारी (ता.१७) जाहीर झालेल्या तिमाही निकालानुसार, ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर सुमारे १९ टक्के वाढ झाली असून, तो ५९० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये, कंपनीने करोत्तर नफ्यात वार्षिक आधारावर सुमारे ११ टक्के वाढ नोंदवली असून, एकूण १९१९ कोटी रुपये निव्वळ नफा कमविला आहे. कंपनीचे एकूण थेट प्रीमियम उत्पन्न (जीडीपीआय) आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २४,७७६ कोटी रुपये आहे, जे आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये २१,०२५ कोटी रुपये होते. आगामी काळातील व्यवसायवृद्धीबाबत कंपनी व्यवस्थापन आशावादी आहे.

General Insurance
Mutual Fund Investment : इक्विटी म्युच्युअल फंडांत मार्चमध्ये घट; दुसऱ्या महिन्यात १९,००० कोटींची गुंतवणूक

आकडेवारीचा विचार करता ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’ने गुणवत्ता संभाळत उत्तम व्यवसायवृद्धी केली आहे. सर्व प्रमुख विभागांमध्ये सातत्याने अग्रणी राहून, कंपनीने नियम, स्पर्धात्मक तीव्रता आणि अपेक्षित नुकसान गुणोत्तरांनुसार व्यवसायाच्या मिश्रणात बदल करण्याची सक्षमता दर्शविली आहे.

प्रतिवर्ष सुमारे १५ टक्क्यांपेक्षा जास्त इक्विटीवर परतावा मिळवत ही कंपनी विमा व्यवसायात प्रगती करत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, क्लाउड आणि डेटा ॲनालिटिक्स यांसारख्या नव्या युगातील तंत्रज्ञानाचा वापर करून कंपनी कार्यक्षमता वाढवून ग्राहकसंपर्क मजबूत करत आहे.

प्रवर्तक बँकेच्या शाखांद्वारे वितरण जाळे भक्कम केल्याने फायद्यात भर घातली जात आहे. कंपनीचा उत्तम व्यवस्थापन संघ शेअरवरील परतावा आणि कार्यपणालीची मजबूत अंमलबजावणी यावर लक्ष केंद्रित करतो, त्यामुळे कंपनी नफा व व्यवसायवाढ यांच्यात चांगला समतोल राखून यशस्वीपणे मार्गक्रमण करत आहे. उत्पादने, सेवा, वितरण, प्रभावी नेतृत्व आणि तंत्रज्ञान या क्षमतांच्या योग्य मिश्रणाने विमा क्षेत्रातील व्यवसायाच्या वाढत्या संधींचा कंपनीला मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. दीर्घावधीमधील व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेता, या शेअरमध्ये मर्यादित प्रमाणात गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com