

A warning illustration showing a fake Income Tax notice email used in phishing scams to steal PAN, bank details, and OTP from taxpayers.
esakal
सध्या सोशल मीडियावर ईमेल आणि इतर माध्यमांद्वारे आयकर विभागाकडून नोटीस आल्याचा दावा करणारे फेक मेसेज मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. या फसवणुकीच्या प्रयत्नांमध्ये करदात्यांना 'मूल्यांकन वर्ष २०२५-२६ साठी जारी केलेल्या असल्याचा दावा करणाऱ्या बनावट 'असेसमेंट ऑर्डर' किंवा कर मागणीच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत. आयकर विभागाने स्पष्ट केले आहे की, अशा सर्व नोटिसा पूर्णपणे बनावट असून, त्यांचा उद्देश करदात्यांची वैयक्तिक आणि बँकिंग माहिती चोरणे किंवा मालवेअर सेट करणे हा आहे.या फसवणकीला बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले.