
ITR Refund
Sakal
आयकर रिटर्न दाखल केल्यानंतर रिफंड किती वेळात मिळतो हा प्रश्न सगळ्यांना पडतो.
लहान रकमेचे रिफंड काही दिवसांत, कधी कधी काही तासांतच मिळतात.
मात्र कॅपिटल गेन किंवा बिझनेस इनकमसारखे गुंतागुंतीचे रिटर्न तपासणीमुळे एका महिन्यापर्यंत अडकू शकतात. उशीर झाल्यास विभाग 6% व्याजही देतं.
ITR Refund: आयकर रिटर्न (ITR) फाईल केल्यानंतर रिफंड कधी मिळणार हा प्रश्न अनेक करदात्यांच्या मनात असतो. याचं उत्तर म्हणजे, वेळ ठरलेली नाही, कारण रिटर्नच्या स्वरूपावर हे अवलंबून असतं. छोट्या रकमेचे रिफंड काही दिवसांतच खात्यात येतात, तर गुंतागुंतीच्या रिटर्नला एका महिन्यापर्यंत वेळ लागू शकतो. चांगली बाब म्हणजे, उशीर झाल्यास विभाग रिफंडसोबत व्याजही देतं.