
करदात्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. आयटीआर दाखल करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली. आयटीआर दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली. आयटीआर दाखल करण्याची तारीख दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली. अनेक सीए आणि करदात्यांना आयटीआर पोर्टलच्या सर्वरमध्ये अडचणींचा सामना करावा लागला. टाइम आऊट, टेक्निकल ग्रीचसह इतर अडचणींमुळे आयटीआर दाखल करता आले नाही. या पार्श्वभूमीवर आयटीआर दाखल करण्याची मुदत एक दिवस वाढवण्यात आली. सरकारने रात्री उशिरा याबाबत निर्णय घेतला.