Income Tax Return: पहिल्यांदाच ITR भरत आहात? 5,000 रुपयांचा दंड टाळण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Income Tax Return: आयकर रिटर्न भरताना करदात्यांनी आयटीआरमध्ये त्यांच्या उत्पन्नाची योग्य माहिती दिली पाहिजे.
Income Tax Return: How to fine ITR
Income Tax Return: How to fine ITRSakal

Income Tax Return Filing ITR for the first time Know key points to remember to avoid Rs 5,000 penalty :

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असल्याने कोणत्याही दंडाशिवाय हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. आर्थिक वर्ष 2022-23 आणि मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी 31 जुलै 2023 पर्यंत तुमचा ITR दाखल करु शकता.

तुम्ही पगारदार व्यक्ती, फ्रीलांसर किंवा व्यवसायाचे मालक असाल, सर्वांसाठी ITR फाइल करणे अनिवार्य आहे.

योग्य कर व्यवस्था निवडा (Income Tax Slabs)

भारतात दोन कर व्यवस्था आहेत - जुनी कर व्यवस्था आणि नवीन कर व्यवस्था. तुमच्या आर्थिक गरजांसाठी सर्वात योग्य कर व्यवस्था निवडा.

आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवा(ITR Required Documents)

आयटीआर भरण्यापूर्वी तुमच्याकडे वैयक्तिक तपशील, कर तपशील, गुंतवणूक आणि उत्पन्नाचा पुरावा यासारखी आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करा.

याव्यतिरिक्त, तुम्हाला तुमच्या कंपनीकडून फॉर्म 16, फॉर्म 26AS, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि वार्षिक माहिती स्टेटमेंट आवश्यक असेल. तुमच्याकडे कर्ज असेल तर व्याज प्रमाणपत्रही तयार ठेवा.

Income Tax Return: How to fine ITR
Income Tax Return: रिफंड मिळाल्यानंतरही तुम्ही ITR मध्ये करु शकता सुधारणा, कसं ते जाणून घ्या!

योग्य ITR फॉर्म निवडा

आयकर विभाग करदात्यांच्या विविध श्रेणींसाठी वेगवेगळे आयटीआर फॉर्म जारी करतो. तुमच्या उत्पन्नावर आणि प्रोफाइलनुसार ITR-1, ITR-2, ITR-3 किंवा ITR-4 मधून योग्य निवडा.

तुमच्या ITR ची पडताळणी करा

  • तुमच्या ITR ची पडताळणी करणे महत्त्वाचे आहे, विशेषत: पहिल्यांदा फाइल करणाऱ्यांसाठी हे महत्त्वाचे आहे. फाइल केल्याच्या 30 दिवसांच्या आत ITR ची पडताळणी झाली नाही तर तुमचा ITR अवैध ठरेल.

  • दंड टाळण्यासाठी, तुम्ही 31 जुलै 2023 पर्यंत तुमचा ITR दाखल केल्याची खात्री करा.

  • 1 ऑगस्ट 2023 पासून उशीरा फाइल करणाऱ्यांना 1,000 रुपये किंवा 5,000 रुपये दंड आकारला जाईल.

  • 5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींना 1,000 रुपये, तर 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना 5,000 रुपयांचा दंड ठोठावला जाईल.

  • या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, तुम्ही तुमचा ITR दाखल करू शकता

Income Tax Return: How to fine ITR
Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com