Housing Sales: घरांच्या किंमती 11% वाढल्या तरी पब्लिक जोमात! महागाईतही चक्क विक्रीत वाढ

Housing Sales: घरांच्या किंमतीत मोठी वाढ, किंमतीही महागल्या, जाणून घ्या कुठे झाली सर्वाधिक विक्री
Housing Sales
Housing SalesEsakal

Housing Sales: 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच जुलै ते सप्टेंबर दरम्यान घरांची विक्री आजपर्यंतच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. रिअल इस्टेट कन्सल्टंट फर्म अॅनारॉकने हा अहवाला प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार, मान्सून कमी असूनही, देशातील टॉप 7 शहरांमध्ये घरांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.

घरांची विक्री वाढल्याने त्यांच्या किंमतीतही 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच नवीन घरांचा पुरवठाही वाढला आहे. याचे कारण रिझर्व बँकेच्या व्याजदरात कोणताही (स्थिर) बदल झाला नाही.

तिसऱ्या तिमाहीत घरांची विक्री 36 टक्क्यांनी वाढली

मालमत्ता सल्लागार फर्म Anarock च्या अहवालानुसार, 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत 1,20,280 घरे विकली गेली, जी गेल्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत विकल्या गेलेल्या 88,230 घरांपेक्षा 36 टक्के जास्त आहे. घरांच्या विक्रीत सर्वाधिक वाढ पुण्यात झाली आहे.

पुण्यातील घरांची विक्री 63 टक्क्यांनी वाढून 22,885 झाली आहे. यानंतर मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) घरांची विक्री 46 टक्क्यांनी वाढून 38,500, चेन्नईमध्ये 42 टक्क्यांनी 4,940, हैदराबादमध्ये 41 टक्क्यांनी 16,375, बेंगळुरूमध्ये 29 टक्क्यांनी 16,395, कोलकात्यात 7 टक्क्यांनी वाढून 5,320 झाली आहे.

नवीन घरांच्या पुरवठ्यात 24 टक्के वाढ

तिसऱ्या तिमाहीत घरांच्या विक्रीत वाढ होण्यासोबतच घरांच्या नवीन पुरवठ्यातही वाढ झाली आहे. या तिमाहीत 1,16,220 घरांचा पुरवठा करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीतील 93,490 पुरवठ्यापेक्षा 24 टक्के जास्त आहे.

नवीन घरांच्या पुरवठ्यात सर्वाधिक 67 टक्के वाढ पुण्यात झाली आहे. यानंतर हैदराबाद 60 टक्के वाढीसह दुसऱ्या स्थानावर आहे.

नवीन घरांच्या पुरवठ्यात चेन्नईमध्ये 28 टक्के, बेंगळुरूमध्ये 7 टक्के आणि एमएमआरमध्ये 1 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर कोलकात्यात 27 टक्क्यांनी घट झाली आहे.

Housing Sales
Video Viral: 102 कोटी रुपयांचे शेअर्स असलेला 'बिगबुल', आजोबांच्या व्हिडिओने घातला धुमाकूळ

घर घेणे झाले महाग

घरांची विक्री आणि पुरवठा वाढल्याने त्यांच्या किंमती वाढल्या आहेत. एनरॉकच्या या अहवालानुसार, 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत घरे 11 टक्क्यांनी महाग झाली आहेत.

2022 च्या तिसऱ्या तिमाहीत प्रमुख 7 शहरांमधील घरांची सरासरी किंमत 6,105 रुपये प्रति चौरस फूट होती, जी 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत 6,800 रुपये प्रति चौरस फूट झाली. हैदराबादमध्ये घरे 18 टक्क्यांनी महाग झाली आहेत.

Housing Sales
RBI Imposes Penalty: SBIनंतर RBI ची मोठी कारवाई, 'या' 3 बँकांना ठोठावला दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

अॅनारॉक ग्रुपचे चेअरमन अनुज पुरी म्हणाले की, पावसाळ्याच्या तिमाहीत घरांची विक्री कमी होते. मात्र यावेळी या तिमाहीत घरांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. याचे कारण म्हणजे RBI ने मागील दोन पतधोरणांदरम्यान रेपो दरात बदल केला नाही.

त्यामुळे कर्जावरील व्याजदर स्थिर राहिले. पुरी यांच्या मते, सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत घरांची विक्री आणि पुरवठा वाढतच राहण्याची अपेक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com