
भारतीय मूळचे अनेक ब्राह्मण आज अमेरिकेतील गूगल, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, अडोब, युट्यूब, मोटोरोलासारख्या दिग्गज कंपन्यांचे CEO आहेत.
सुंदर पिचाई, सत्या नडेला, शांतनु नारायण, अरविंद कृष्णन, नील मोहन यांच्यासारखे CEO जागतिक तंत्रज्ञान क्षेत्राचे नेतृत्व करत आहेत.
ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय ब्राह्मणांवर वादग्रस्त विधान केले होते.
Brahmin CEO in America: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय ब्राह्मणांवर वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी म्हटले होते की, भारतातील सर्व नफा ब्राह्मण घेत आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे की अमेरिकेतील नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांचे नेतृत्व आज भारतीय ब्राह्मण CEO लोकांच्या हातात आहे.