Indian Startup: आनंदाची बातमी! भारतीय स्टार्टअप्सनी कर्मचाऱ्यांच्या पगारात केली वाढ, किती मिळाला पगार?

Indian Startup Salary: भारतीय स्टार्टअप्सनी कर्मचाऱ्यांच्या पगारात केली वाढ
Indian startup
Indian startupSakal

Indian Startup Salary: भारतीय स्टार्टअप्सनी यावर्षी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 8 ते 11 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामध्येही सुरुवातीच्या आणि मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त 15 ते 20 टक्के वेतनवाढ मिळाली आहे.

एलिव्हेशन कॅपिटलच्या 'स्टार्टअप पीपल रिपोर्ट 2023' मधून ही माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, पगारवाढीमध्ये सुमारे 50 टक्के वाटा गेल्या वर्षभरातील कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा आहे. त्याच वेळी, अतिरिक्त जबाबदाऱ्या आणि पदोन्नतीचा 20 टक्के वाटा आहे.

Indian startup
Import Ban: लॅपटॉपनंतर आता कॅमेरे आणि प्रिंटरवरही लागणार आयात निर्बंध? काय आहे मोदी सरकारचा नवा प्लॅन?

पगारवाढीस कारणीभूत असलेल्या इतर घटकांमध्ये नवीन असाइनमेंट/करिअरची प्रगती (15 टक्के), महागाई आणि बाजारातील स्पर्धा (10 टक्के) आणि इतर कारणे (5 टक्के) यांचा समावेश होता.

अहवालानुसार, CXO आणि कार्य प्रमुखांसारख्या उच्च-स्तरीय कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीऐवजी स्टॉक-आधारित वेतनवाढीचा कल वाढला आहे. एलिव्हेशन कॅपिटल येथील टॅलेंटचे उपाध्यक्ष कॅलेन एच. म्हणाले, “आम्हाला आढळून आले की 50 टक्के कंपन्या रोख रकमेच्या अल्प वाढीच्या बदल्यात अतिरिक्त इक्विटी पेमेंट ऑफर करण्याचा विचार करत आहेत.”

Indian startup
RBI Penalty: रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, 'या' चार बँकांना ठोठावला दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम?

बाजारातील परिस्थितीतील बदलामुळे पगारात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, नोकरी शोधणारे कमी पगारावर सेटल होण्यापेक्षा योग्य नोकरीच्या संधीसाठी जास्त वेळ प्रतीक्षा करण्यास इच्छुक आहेत." असे एलिव्हेशन कॅपिटलचे दिपेश जैन म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com