
भारत–ब्रिटन मुक्त व्यापार करार (FTA) 24 जुलै 2025 रोजी होणार असून, 2030 पर्यंत दोन्ही देशांचा व्यापार दुप्पट म्हणजे 120 अब्ज डॉलर्सवर पोहोचणार आहे.
कर कपातीमुळे भारतीय कपडे, दागिने, सीफूड, ऑटो पार्ट्स ब्रिटनमध्ये स्वस्त होतील, तर भारतात व्हिस्की, लग्झरी कार्स, चॉकलेट्स आणि मेडिकल उपकरणं स्वस्त मिळतील.
रोजगार आणि संधी – भारतीय शेफ, योग प्रशिक्षक, संगीतकारांना ब्रिटनमध्ये कामाची परवानगी मिळेल आणि सोशल सिक्युरिटीवर मोठी सूट मिळणार आहे.
India-UK Free Trade Agreement: भारत आणि ब्रिटेन यांच्यातील संबंध खूप जुने आहेत. पण आता हे संबंध एका नव्या उंचीवर जाणार आहेत. 24 जुलै 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनला पोहोचले. त्यांच्या या भेटीत एक ऐतिहासिक करार होणार आहे. हा भारत-ब्रिटेन मुक्त व्यापार करार आहे, म्हणजेच FTA.