
Forex Reserves Fall: परकीय चलनाच्या साठ्यात सातत्याने घट होत आहे. रुपयाच्या घसरणीचा थेट परिणाम फॉरेक्सवर होत आहे. रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेला अधिक डॉलर्स खर्च करावे लागत आहेत. देशाचा परकीय चलन साठा 20 डिसेंबर रोजी 8.48 अब्ज डॉलरने घसरून 644.39 अब्ज डॉलरवर आला.