Share Market Today: इंट्राडे ट्रेडिंगसह गुंतवणुकीची संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market Investment Tips: गुरुवारी निफ्टीच्या विकली एक्स्पायरीच्या दिवशी बाजारात जोरदार विक्री दिसून आली. बीएसई ऑटो इंडेक्स वगळता सर्वच सेक्टरमध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जवळपास 1.5 टक्क्यांची घसरण झाली आहे.
Investment Tips in marathi Which 10 shares perform today
Investment Tips in marathi Which 10 shares perform today Sakal

Share Market Investment Tips (Marathi News): गुरुवारी निफ्टीच्या विकली एक्स्पायरीच्या दिवशी बाजारात जोरदार विक्री दिसून आली. बीएसई ऑटो इंडेक्स वगळता सर्वच सेक्टरमध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जवळपास 1.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. निफ्टी पुन्हा 21,950 च्या खाली घसरला, सेन्सेक्स 1062 अंकांनी घसरला आणि 72,404 वर बंद झाला. निफ्टी 345 अंकांनी घसरून 21,958 वर बंद झाला. बँक निफ्टी 533 अंकांनी घसरून 47,488 वर बंद झाला. मिडकॅप 927 अंकांनी घसरून 49,109 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बँक निफ्टी इंडेक्स मंदीच्या दबावाखाली राहिला आणि क्लोजिंग आधारावर 50-डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या (EMA) महत्त्वाच्या पातळीच्या खाली गेल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. आता बँक निफ्टीचा पुढील सपोर्ट 47,400 वर दिसत आहे.

जर हा सपोर्ट देखील तुटला, तर तो 100-दिवसांच्या ईएमएडे म्हणजेच 47,050 पॉइंटपर्यंत घसरू शकतो. त्याच वेळी, बँक निफ्टीसाठी 48,000 वर रझिस्टन्स दिसून येत आहे. या पातळीवर आक्रमक कॉल रायटिंग दिसून आले आहे. या रझिस्टन्स पातळीच्या वर गेल्यास बँक निफ्टी 48,500 अंकांच्या दिशेने शॉर्ट-कव्हरिंग ट्रिगर सुरू होऊ शकते.

Investment Tips in marathi Which 10 shares perform today
Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

निफ्टी त्याच्या अपवर्ड चॅनेलच्या खालच्या सीमेच्या खाली आणि 22,150 च्या आसपास असलेल्या 50-दिवसांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज (DEMA) च्या समर्थनाच्या खाली गेल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. अस्थिरता इंडेक्समधील वाढ सूचित करते की सध्याची कमजोरी कायम राहू शकते. निफ्टी लवकरच 21,800-21,850 च्या झोनपर्यंत घसरेल.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • एल अ‍ॅण्ड टी (LT)

  • बीपीसीएल (BPCL)

  • एशियन पेंट्स (ASIANPAINT)

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • ओएनजीसी (ONGC)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • ज्युबिलंट फूड(JUBLFOOD)

  • एचडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी ( HDFCAMC)

Investment Tips in marathi Which 10 shares perform today
Mutual Funds Investment: शेअर बाजार ऐतिहासिक उच्चांकावर, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची 'ही' योग्य वेळ आहे का?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com