
Israel-Iran Conflict: इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. जर ही वाढ आणखी कायम राहिली तर काही कंपन्यांना तोटा सहन करावा लागू शकतो.
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा भारतावरही परिणाम होऊ शकतो. कच्च्या तेलाचे शुद्धीकरण करणाऱ्या, पेंट, विमाने, वाहने, पेट्रोकेमिकल्स आणि खते बनवणाऱ्या कंपन्यांना याचा फटका बसू शकतो. तेल काढणाऱ्या कंपन्या आणि इलेक्ट्रिक वाहने (EV) बनवणाऱ्या कंपन्यांना याचा फायदा होऊ शकतो. हे सरकारच्या धोरणांवर अवलंबून असेल.