
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या अहवालानुसार, 8वा वेतन आयोग 2026 च्या अखेरीस किंवा 2027 च्या सुरुवातीला लागू होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 30-34% वाढ, किमान वेतन 18,000 वरून 30,000 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता.
या पगारवाढीमुळे सरकारवर 2.4-3.2 लाख कोटींचा भार पडेल, पण खर्च, गुंतवणूक आणि मागणीत वाढ होणार आहे.
8th Pay Commission: केंद्र सरकारचे कर्मचारी 8वा वेतन आयोग लागू होण्याची वाट पाहत आहेत. या आयोगामुळे पगारात मोठी वाढ होणार असल्याची चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात 8वा वेतन आयोग कधी लागू होऊ शकतो आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होऊ शकते, याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.