
Larry Ellison
Sakal
ओरेकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन यांनी इलॉन मस्कला मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
तब्बल 393 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचे मालक असलेले एलिसन हवेल्या, रिसॉर्ट्स आणि संपूर्ण बेटाचे मालक आहेत.
त्यांचे आलिशान प्रॉपर्टी कलेक्शन हवाईपासून ते मालिबू, क्योटो आणि पाम बीचपर्यंत पसरलेले आहे.
Larry Ellison: जगातील अब्जाधीशांच्या यादीत मोठा बदल झाला आहे. ओरेकलचे 81 वर्षीय सह-संस्थापक लॅरी एलिसन यांनी इलॉन मस्कला मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. सध्या एलिसन यांची संपत्ती तब्बल 393 अब्ज डॉलर्स इतकी असल्याचा अंदाज आहे.
लॅरी एलिसन यांना अमेरिकेतील सर्वात मोठे ‘ट्रॉफी-होम खरेदीदार’ मानले जाते. कारण त्यांच्या कलेक्शनमध्ये केवळ हवेल्याच नाहीत, तर बेटे, रिसॉर्ट्स, आर्ट म्युझियम आणि वेलनेस सेंटर देखील आहेत. त्यांची मालमत्ता जगभरात आहे आणि त्याची किंमत अब्जावधी डॉलर्समध्ये आहे.