
ट्रम्प यांनी म्हटलं की भारतासोबत व्यापार फारच कमी आहे आणि त्यांचे टॅरिफ जगातील सर्वात जास्त आहेत.
त्यामुळे भारताच्या ‘मरणपावणाऱ्या अर्थव्यवस्थेची’ त्यांना काळजी नसल्याचं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं.
रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव यांना ट्रम्प यांनी थेट इशारा दिला.
Donald Trump Tariffs Updates: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि रशियावर सडकून टीका केली आहे. X (पूर्वीचे ट्विटर) वर त्यांनी केलेल्या पोस्टमधून भारताच्या व्यापार धोरणावर आक्रमक भाषेत नाराजी व्यक्त केली असून, रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव यांना ‘धोक्याच्या मार्गावर चालला आहे’ असा थेट इशाराही दिला आहे.