Lok Sabha Election: 5,785 कोटींची मालमत्ता, पत्नीही कोट्यधीश; कोण आहेत लोकसभेचे सर्वात श्रीमंत उमेदवार?

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. देशातील अनेक श्रीमंत उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत, परंतु 2024च्या लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत समोर आलेल्या उमेदवारांमध्ये हा उमेदवार सर्वात श्रीमंत आहे.
Lok Sabha 2024 Richest Candidate Pemmasani Chandra Sekhar from tdp in andhra pradesh
Lok Sabha 2024 Richest Candidate Pemmasani Chandra Sekhar from tdp in andhra pradesh Sakal

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. देशातील अनेक श्रीमंत उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत, परंतु 2024च्या लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत समोर आलेल्या उमेदवारांमध्ये हा उमेदवार सर्वात श्रीमंत आहे. पेम्मासानी चंद्रशेखर यांनी आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभा मतदारसंघातून तेलुगू देसम पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी 5,785.28 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. पेम्मासानी चंद्र शेखर हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आतापर्यंतचे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र 37 पानांचे आहे.

Lok Sabha 2024 Richest Candidate Pemmasani Chandra Sekhar from tdp in andhra pradesh
Jobs: लोकसभा निवडणुकीत 9 लाख कंत्राटी नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता; उद्योग तज्ज्ञांचा दावा

48 वर्षीय पेम्मासानी चंद्र शेखर हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. एनआरआय डॉक्टरमधून राजकारणी झालेले पेम्मासानी चंद्र शेखर यांना आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने गुंटूरमधून उमेदवारी दिली आहे.

22 एप्रिल रोजी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या जागेवर त्यांचा सामना काँग्रेस आणि सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्षाशी होणार आहे. डॉ. शेखर यांचे कुटुंब मूळचे गुंटूर जिल्ह्यातील बुरीपलेमचे आहे.

पेम्मासानी यांनी EAMCET मध्ये 27 वा क्रमांक मिळवला आणि उस्मानिया विद्यापीठातून एमबीबीएस केले. त्यानंतर ते पदव्युत्तर पदवीसाठी यूएसला गेले. डॉ.शेखर यांची बहुतांश मालमत्ता अमेरिकेत आहे. आर्थिक वर्ष 2012-23 मध्ये त्यांचे भारतातील उत्पन्न 3.68 लाख रुपये होते, तर त्याच कालावधीत त्यांनी त्यांच्या पत्नीसह 605.5 कोटी रुपये कमावले.

Lok Sabha 2024 Richest Candidate Pemmasani Chandra Sekhar from tdp in andhra pradesh
Loksabha Election: लोकसभा निवडणुकी दरम्यान ऑनलाइन पेमेंटवरही आरबीआयची नजर; मार्गदर्शक सूचना जारी

त्यांनी US कर अधिकाऱ्यांना FY21 आणि FY20 साठी अनुक्रमे 643 कोटी आणि 594 कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर केले. ते आणि त्यांची पत्नी कंपनीचे 50 टक्के भागधारक आहेत. दोघांनी अमेरिकन बँकेकडून 1,038 कोटी रुपये क्रेडिट म्हणून घेतले आहेत.

डॉ. पेम्मासानी 2014 पासून गुंटूरमधून तिकीट मागत होते. दोन वेळा गुंटूरचे खासदार झालेले जयदेव गल्ला यांनी या वर्षी जानेवारीत राजकारण सोडल्यानंतर त्यांना संधी मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com