Share Market Opening: लोकसभा निवडणुकीत काटे की टक्कर; शेअर बाजार उघडताच कोसळला

Share Market Today: लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या घोषणेच्या निमित्ताने चालू आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी मंगळवारी शेअर बाजाराचे कामकाज घसरणीसह सुरू झाले. BSE सेन्सेक्स 1640 अंकांनी घसरला आहे आणि 74854 अंकांच्या पातळीवर उघडला आहे.
Share Market Latest Update
Share Market Sakal

Share Market Opening Latest Update 4 June 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या घोषणेच्या निमित्ताने चालू आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी मंगळवारी शेअर बाजाराचे कामकाज घसरणीसह सुरू झाले. BSE सेन्सेक्स 2111 अंकांनी घसरला आहे आणि 74,313 अंकांच्या पातळीवर उघडला आहे तर निफ्टी 684 अंकांनी घसरून 22,565 अंकांच्या पातळीवर उघडला आहे.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल चिन्हात व्यवहार करत होते. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात वाढ दर्शविणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सन फार्मा, ब्रिटानिया, नेस्ले, एचयूएल, सिप्ला, एशियन पेंट्स आणि डॉक्टर रेड्डीजचे शेअर्स आहेत. तर अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, एसबीआय, ओएनजीसी, लार्सन, पॉवर ग्रिड आणि एनटीपीसीच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

Share Market Today
Share Market Opening Sakal
Share Market Latest Update
Bank Clinic: बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! आता कोणतीही तक्रार एकाच पोर्टलवर करता येणार

शेअर बाजारासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. आज देशभरात 543 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. सोमवारी बाजार 3 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाला होता. आज काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. निफ्टी 733 अंकांनी वाढून 23,263 वर बंद झाला. सेन्सेक्स 2507 अंकांनी वाढून 76,468 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 1996 अंकांनी वाढून 50,979 वर बंद झाला होता.

Share Market Today
Share Market Opening Sakal

अदानी समूहाच्या 10 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण

मंगळवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात गौतम अदानी समूहाच्या सर्व 10 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. अदानी एंटरप्रायझेस 6.39 टक्क्यांनी घसरला तर एसीसी लिमिटेडचे ​​शेअर्स 4 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते.

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स, टीसीएस, एचसीएल, इन्फोसिस, विप्रो, कोटक महिंद्रा, इंजिनियर्स इंडिया, एचडीएफसी, प्राज इंडस्ट्रीज, अशोक लेलँड, फिनोलेक्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, ओएनजीसी आणि इरकॉन इंटरनॅशनलच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

Share Market Latest Update
Inflation : सर्वसामान्यांच्या ताटातील वरण-भातसुद्धा महागला; डाळीनंतर तांदळाचा भावही वाढला
Share Market Today
BSE SENSEXSakal

आशियाई बाजारात विक्री

आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये विक्री दिसून येत आहे. GIFT NIFTY मध्ये 0.27 टक्के वाढ असली तरी Nikkei 0.51 टक्के घसरला आहे. स्ट्रेट टाइम्समध्ये 0.10 टक्के आणि हँग सेंगमध्ये 0.37 टक्के घसरण झाली आहे. तैवान वेटेडमध्ये 0.23 टक्के घट, कोस्पीमध्ये 0.40 टक्के घसरण आणि शांघाय कंपोझिटमध्ये 0.34 टक्के घसरण झाली आहे.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 10.32 लाख कोटी रुपयांची घसरण

एक ट्रेडिंग दिवस आधी म्हणजे 3 जून 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप रुपये 4,25,91,511.54 कोटी होते. आज म्हणजेच 4 जून 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,15,59,174.70 कोटी रुपयांवर आले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 10,32,336.84 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com