Anil Ambani: कर्जबाजारी अनिल अंबानींना मिळणार 4,000,00,00,000 रुपयांचा चेक, पण हातून जाणार मोठा प्रकल्प

Anil Ambani To Get 4000 Crore From Stake Sale In Mumbai Metro: उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतील मेट्रो-1 कॉरिडॉरमधील अनिल अंबानी यांच्या कंपनी आर-इन्फ्रामधील 74% हिस्सा खरेदी करण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे.
Anil Ambani To Get 4000 Crore From Stake Sale In Mumbai Metro
Anil Ambani To Get 4000 Crore From Stake Sale In Mumbai MetroSakal

Anil Ambani Mumbai Metro: मुंबईतील मेट्रो-1 कॉरिडॉरमधील अनिल अंबानी यांच्या कंपनी आर-इन्फ्रामधील 74% हिस्सा खरेदी करण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. एमएमआरडीए हा हिस्सा 4 हजार कोटी रुपयांना विकत घेणार आहे. अशा प्रकारे आर-इन्फ्रा या प्रकल्पातून पूर्णपणे बाहेर पडेल.

मुंबईत 337 किमी लांबीचे मेट्रो नेटवर्क तयार केले जात आहे. 11.4 किमी लांबीचा मेट्रो-1 कॉरिडॉर वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर दरम्यान आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून बांधलेला हा एकमेव कॉरिडॉर आहे. (Maharashtra Cabinet approves purchase of MMRDA-Reliance Infra joint venture Anil Ambani With Rs 4,000 Crore)

अनिल अंबानींच्या प्रकल्पाच्या संपादनानंतर महाराष्ट्र सरकारला मुंबई मेट्रो वनमध्ये 74 टक्के हिस्सा मिळणार आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालानुसार, या प्रकल्पातील अंबानींच्या 74 टक्के स्टेकचे मूल्य 4,000 कोटी इतके आहे.

सोमवारी, राज्य मंत्रिमंडळाने सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आणि माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अहवालाला मंजुरी दिली, ज्यामध्ये आर-इन्फ्राच्या स्टेकचे मूल्य 4,000 कोटी आहे.

संयुक्त उपक्रम हा नेहमीच भागीदारांमधील वादाचा विषय राहिला आहे. अहवालानुसार, एमएमआरडीएकडे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) नावाच्या संस्थेमध्ये 26 टक्के हिस्सा आहे, तर आर-इन्फ्राकडे 74 टक्के हिस्सा आहे.

Anil Ambani To Get 4000 Crore From Stake Sale In Mumbai Metro
Gold Loan: गोल्ड लोन फसवणूक प्रकरणी RBIने घेतली कठोर भूमिका; बँकांकडून मागवली माहिती, काय आहे प्रकरण?

हा प्रकल्प वादात सापडला होता

MMRDA-रिलायन्स इन्फ्रा संयुक्त उपक्रम प्रकल्प तिकीट दर, भाडेवाढ आणि अशा विविध मुद्द्यांवरून वादग्रस्त आहे. एमएमओपीएलने सतत तोट्याचा दावा केला आहे, तर एमएमआरडीएने या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाडेवाढीची मागणी फेटाळून लावली आहे.

या निर्णयावर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी टीका केली

या निर्णयावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. अहवालात चव्हाण यांचा हवाला देत म्हटले आहे की, "अधिग्रहण किंमतीबाबत वाद झाला होता. सरकारला आर्थिक आणि कायदेशीर सल्ला देण्यात आला होता. प्रकल्पाची किंमत खूप जास्त होती. पण हे सरकार अनिल अंबानी समूहाची बाजू घेत आहे."

Anil Ambani To Get 4000 Crore From Stake Sale In Mumbai Metro
GoAir: तिकीटाचा घोळ अन् एक लाखाचा दंड; गुजराती प्रवाशाने शिकवला विमान कंपनीला धडा, काय आहे प्रकरण?

मेट्रो-1 मार्गावरून दररोज साडेचार लाख प्रवासी प्रवास करतात. त्याच्या किंमतीबाबत एमएमओपीएल आणि एमएमआरडीए यांच्यात कायदेशीर लढाईही सुरू आहे. हा कॉरिडॉर तयार करण्यासाठी 4,026 कोटी रुपये खर्च आल्याचा MMOPL दावा आहे, तर MMRDA म्हणते की त्याची मूळ किंमत 2,356 कोटी रुपये होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com