Maiden Forgings : मेडेन फोर्जिंग्सच्या आयपीओसाठी तयार राहा...होईल एवढा नफा

कंपनीने आपल्या आयपओतून 24 कोटी रुपये उभारण्याची योजना असल्याचे सांगितले. आयपीओसाठी 22 मार्च ते 24 मार्च दरम्यान बोली लावता येईल
Maiden Forgings
Maiden Forgingsesakal

Maiden Forgings : स्टील रॉड्स आणि वायर मेकर मेडेन फोर्जिंग्सचा (Maiden Forgings) आयपीओ 22 मार्चला खुला होईल. कंपनीने आपल्या आयपओतून 24 कोटी रुपये उभारण्याची योजना असल्याचे सांगितले. आयपीओसाठी 22 मार्च ते 24 मार्च दरम्यान बोली लावता येईल.

आयपीओद्वारे एकूण 37,84,000 शेअर्स विक्रीसाठी ठेवतील अशी माहिती मेडेन फोर्जिंग्सने दिली. यामध्ये 17,97,000 शेअर्स क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी (QIB) राखीव असतील. तर 5,39,100 शेअर्स गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) असतील आणि बाकी शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील.

सध्या भारतात स्पेशॅलिटी स्टीलची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते आणि आम्हाला ही जागा भरायची आहे असे मेडेन फोर्जिंग्जचे व्यवस्थापकीय संचालक निशांत गर्ग म्हणाले. त्याच वेळी, आम्हाला नवीन निर्यात बाजारपेठांमध्ये विस्तार करायचा आहे. हा आयपीओ उत्तम दर्जाचे प्रॉडक्ट्स डिलिव्हर करण्यासोबत दीर्घकालीन उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत करेल.

Maiden Forgings
Tata Technologies IPO : पैसे कमावण्याची सुवर्णसंधी! 19 वर्षांनंतर टाटांची IPO एन्ट्री

मेडेन फोर्जिंग्सच्या आयपीओचे बुक-रनिंग लीड मॅनेजर शेअर इंडिया कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आहेत आणि इश्यूचे रजिस्ट्रार माशितला सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड आहेत. कंपनीचे मुख्यालय यूपीमध्ये आहे. शिवाय गाझियाबादमध्ये त्यांचे तीन प्लांट्स आहेत. कंपनी ऑटो आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील ग्राहकांसाठी उत्पादने तयार करते. (IPO)

Maiden Forgings
IPO News : ग्लोबल सरफेसचा आयपीओ आजपासून खुला, किंमतीपासून गुंतवणुकीपर्यंत संपूर्ण माहिती एका क्लिकवर

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. (Profit)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com