Malabar Gold and Diamonds : ‘मलाबार’ची अल्पावधीत १० स्टोअर

मलाबार गोल्ड अँड डायमंड्स ही आघाडीची ज्वेलरी रिटेलर कंपनी लवकरच १० नवे स्टोअर उघडणार असून, ३१ मार्चपर्यंत जागतिक विस्तार धोरणानुसार २५० नवे स्टोअर उघडण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीच्या वतीने नुकतीच ही घोषणा करण्यात आली.
Malabar Gold and Diamonds
Malabar Gold and Diamondssakal

मुंबई : मलाबार गोल्ड अँड डायमंड्स ही आघाडीची ज्वेलरी रिटेलर कंपनी लवकरच १० नवे स्टोअर उघडणार असून, ३१ मार्चपर्यंत जागतिक विस्तार धोरणानुसार २५० नवे स्टोअर उघडण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीच्या वतीने नुकतीच ही घोषणा करण्यात आली.

‘मलाबार गोल्ड’ सध्या जगात सहाव्या क्रमांकाचा ज्वेलरी ग्रुप आहे, तर डेलॉइट लक्झरी गुड्स ग्लोबल रँकिंगमध्ये १९ व्या क्रमांकावर आहे. देशात उघडल्या जाणाऱ्या नव्या स्टोअरमध्ये महाराष्ट्रातील लातूर, सातारा आणि नागपूर येथील स्टोअरचा, कर्नाटकातील कोलार आणि व्हाइटफील्ड, राजस्थानमध्ये जयपूर, दिल्लीतील चांदणी चौक, आंध्र प्रदेशातील वनस्थळीपुरम, पंजाबमधील पटियाला आणि पुदुच्चेरी येथील स्टोअरचा समावेश आहे. मलाबार ग्रुपचे अध्यक्ष एम. पी. अहमद म्हणाले,

Malabar Gold and Diamonds
WTO Ministerial Conference : ‘डब्लूटीओ’च्या अस्तित्वाचा प्रश्‍न उपस्थित

‘‘आम्ही ‘मेक इन इंडिया मार्केट टू दि वर्ल्ड’ची संकल्पना विकसित करून जागतिक पातळीवर उत्तम प्रगती साध्य केली आहे. दहा नवी स्टोअर उघडण्यासाठी तयारी करत असताना, आम्ही आमचे सर्व मौल्यवान ग्राहक, टीम सदस्य आणि गुंतवणूकदारांप्रति कृतज्ञता व्यक्त करतो. कारण हे शक्य करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com