Melinda Gates: मेलिंडा गेट्स यांनी गेट्स फाऊंडेशनचा दिला राजीनामा; पुढील कामासाठी मिळणार 1,00,000 कोटी रुपये

Melinda Gates exits Gates Foundation: जगातील आघाडीचे उद्योगपती बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांना विभक्त होऊन 3 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आता हळूहळू मेलिंडा देखील बिल गेट्सच्या व्यवसायापासून वेगळे होत आहे.
Melinda Gates exits Gates Foundation, gets 12.5 billion dollar grant for her next chapter of philanthropy
Melinda Gates exits Gates Foundation, gets 12.5 billion dollar grant for her next chapter of philanthropy Sakal

Melinda Gates exits Gates Foundation: जगातील आघाडीचे उद्योगपती बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांना विभक्त होऊन 3 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आता हळूहळू मेलिंडा देखील बिल गेट्सच्या व्यवसायापासून वेगळे होत आहे. मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या सह-अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.

ही संस्था जगातील सर्वात प्रभावशाली संस्था मानली जाते. "माझा फाउंडेशनमधील कामाचा शेवटचा दिवस 7 जून असेल," असे त्यांनी X वर पोस्ट केले.

त्या म्हणाला की, मी हा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला आहे. मेलिंडा 2000 पासून या फाउंडेशनशी संबंधित आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राजीनाम्यानंतर मेलिंडा यांना त्यांचे काम सुरू ठेवण्यासाठी 12.5 अब्ज डॉलर्स मिळतील.

Melinda Gates exits Gates Foundation, gets 12.5 billion dollar grant for her next chapter of philanthropy
Walmart Layoffs: वॉलमार्टमध्ये पुन्हा मोठी कर्मचारी कपात; शेकडो कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

आपल्या राजीनाम्याची घोषणा करताना मेलिंडा गेट्स म्हणाल्या, "गेट्स फाऊंडेशन मजबूत स्थितीत असल्याने मी हे पाऊल उचलत आहे." मेलिंडा गेट्स म्हणाल्या की, बिल गेट्ससोबतच्या माझ्या कराराच्या अटींनुसार, मी जेव्हा फाउंडेशन सोडेन तेव्हा माझ्याकडे महिला आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित कामासाठी अतिरिक्त 12.5 अब्ज डॉलर्स असतील. भारतीय रुपयात ही रक्कम 1,00,000 कोटी आहे.

बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे सीईओ मार्क सुझमन म्हणाले, "बिल गेट्सचा वारसा आणि मेलिंडाच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी" फाउंडेशनचे नाव बदलून गेट्स फाउंडेशन केले जाईल. तसेच, आता बिल गेट्स "फाऊंडेशनचे एकमेव अध्यक्ष राहतील."

Melinda Gates exits Gates Foundation, gets 12.5 billion dollar grant for her next chapter of philanthropy
EPFO: आनंदाची बातमी! EPFOने घेतला मोठा निर्णय; 6 कोटी PF खातेधारकांना होणार फायदा

बिल आणि मेलिंडा गेट्स यांचा 2021 मध्ये घटस्फोट

मेलिंडा गेट्स यांच्या राजीनाम्यानंतर बिल गेट्स यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये मेलिंडा गेट्स यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. 27 वर्षांच्या लग्नानंतर बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी 2021 मध्ये घटस्फोट घेतला, परंतु ते फाउंडेशनमध्ये एकत्र काम करत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com