BSNL Revival: BSNL करणार अंबानींच्या Jio शी स्पर्धा? चक्क मोदींनी दिला ग्रीन सिग्नल|Modi Government approves revival package of 89,047 crore for BSNL | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BSNL Revival Plan

BSNL Revival: BSNL करणार अंबानींच्या Jio शी स्पर्धा? चक्क मोदींनी दिला ग्रीन सिग्नल

BSNL Revival Plan: आज सरकारने सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) साठी एक मोठी घोषणा केली आहे.

कॅबिनेट समितीने बीएसएनएलसाठी 89,047 कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स (CCEA) ने आज या निर्णयाला मंजुरी दिली आहे.

मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत अधिक गुंतवणूक:

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, 1 एप्रिल 2023 पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने 52,937 कोटी रुपयांचे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे, जे मागील आर्थिक वर्षात 44,720 कोटी रुपये होते. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत सरकारने अधिक गुंतवणूक केली आहे.

गुंतवणूक कशासाठी केली आहे:

ही गुंतवणूक BSNL च्या 4G आणि 5G सेवांसाठी वापरली जाईल. सरकारी दूरसंचार कंपनीला तिच्या धोरणात्मक महत्त्वामुळे अधिक संधी मिळाली पाहिजे, असे सरकारचे मत आहे.

2022 मध्ये देखील जुलै महिन्यात केंद्र सरकारने BSNL च्या पॅकेजसाठी 1.64 लाख कोटी रुपयांची घोषणा केली होती आणि कंपनी फायदेशीर बनण्याचा विश्वास व्यक्त केला होता.

याशिवाय, केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (BBNL) चे BSNL मध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.

या विलीनीकरणासह, BSNL ला अतिरिक्त 5.67 लाख किमी ऑप्टिकल फायबर नेटवर्क मिळाले, ज्याची व्याप्ती सुमारे 1.85 लाख ग्रामपंचायतींमध्ये पसरली होती. युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंडाच्या माध्यमातून हे नेटवर्क बीएसएनएलकडे सुपूर्द करण्यात येणार होते.

निवेदनानुसार, आता बीएसएनएल या सेवा देण्यास सक्षम असेल:

1. देशभरात 4G आणि 5G सेवा

2. ग्रामीण भागात 4G कव्हरेज देणे

3. हाय-स्पीड इंटरनेटसाठी निश्चित वायरलेस ऍक्सेस सेवा देणे

या पॅकेजसह, सरकार भारत संचार निगम लिमिटेडचे ​​पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करत आहे.

मंत्रिमंडळाचे इतर महत्त्वाचे निर्णय:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2023-24 च्या हंगामासाठी खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली.

ज्यामध्ये तूर डाळीच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 400 रुपयांनी वाढ करून 7000 पये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. उडद डाळीच्या एमएसपीमध्येही 350 रुपयांनी वाढ करून 6950 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे.