
अमेरिकन अर्थव्यवस्था गंभीर मंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा मूडीजने दिला आहे.
GDP च्या एक-तृतीयांश भागावर मंदीचं संकट असून नोकऱ्यांमध्ये मोठी कपात झाली आहे.
तरीही डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ पॉलिसीचा बचाव करत आहेत.
Moody's Warning To America: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगभरातील देशांवर टॅरिफ लादत असताना, ग्लोबल रेटिंग एजन्सी मूडीजने त्यांना मोठा धक्का दिला आहे. मूडीजच्या ताज्या अहवालानुसार, अमेरिका गंभीर मंदीच्या उंबरठ्यावर आहे आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या जवळपास एक-तृतीयांश भागात आधीच संकटाचे सावट आहे.