
Mutual Fund: लोकप्रिय म्युच्युअल फंड गुंतवणूक प्लॅटफॉर्म पिगी, जूनमध्ये त्यांचे कामकाज बंद करणार आहे. कंपनीने अलीकडेच त्यांच्या सर्व ग्राहकांना ईमेलद्वारे याबद्दल माहिती दिली आहे. पुढील 30 दिवसांत अॅप आणि वेब पोर्टल बंद केले जाईल. या घोषणेमुळे हजारो गुंतवणूकदारांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत की त्यांचे पैसे सुरक्षित आहेत का? एसआयपी बंद होणार का? गुंतवणूक हस्तांतरित करता येईल का?