
Nepal Crisis Hits FMCG:
Sakal
नेपाळमधील हिंसाचारामुळे डाबर आणि ब्रिटानियाचे उत्पादन थांबले आहे.
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव ब्रिटानियाने कारखाना बंद केला, तर डाबरचे उत्पादनही ठप्प झाले आहे.
या अस्थिरतेमुळे च्यवनप्राश, बिस्किटसारख्या दैनंदिन वस्तूंचा पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे.
Nepal Crisis Hits FMCG: नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय व सामाजिक अस्थिरतेमुळे अर्थकारणाला फटका बसत आहे. राजधानी काठमांडूसह अनेक भागांत उसळलेल्या हिंसाचारामुळे भारतीय एफएमसीजी कंपन्यांचे कामकाज विस्कळीत झाले आहे. च्यवनप्राश, बिस्किटसारख्या दैनंदिन वापरातील वस्तूंच्या उत्पादनावर थेट परिणाम होत असून ग्राहकांपर्यंत त्याचा पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे.