
DMart Rates
Sakal
सरकारच्या नव्या जीएसटी सुधारणा योजनांमुळे दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील कर मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
डीमार्टसारख्या रिटेल स्टोअर्समध्ये ग्राहकांना साबण, तेल, स्नॅक्स आणि शैक्षणिक वस्तूंवर थेट बचत होणार आहे.
यामुळे घरगुती खर्च कमी होऊन सणासुदीच्या खरेदीला चालना मिळेल.
New GST Rates: सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) स्लॅबमुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रोजच्या वापरातील अनेक वस्तूंवरचा कर कमी झाला आहे. विशेषत: डीमार्टसारख्या मोठ्या रिटेल चेनमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांची आता आवश्यक वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत प्रत्येक गोष्टीवर बचत होणार आहे.