
New Income Tax Rules From April 2025: 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या बजेट 2025 मध्ये TDS संबंधित नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. नवीन नियम 1 एप्रिल 2025 पासून लागू केले जातील. या बदलांसह, लाभांश, लॉटरी, ब्रोकरेज, डिजिटल असेटची विक्री, भाडे आणि व्यावसायिक सेवांवरील कर या नियमांमध्ये बदल होणार आहेत.
याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. बॉम्बे चार्टर्ड अकाउंटंट्स सोसायटीच्या सीए किंजल भुटा यांनी सांगितले की, 2025 च्या बजेटमध्ये टीडीएस कपातीची मर्यादा वाढवण्यात आली आहे.