Budget 2025 : अर्थमंत्री असूनही एकदाही अर्थसंकल्प सादर केला नाही; कोण आहेत भारताचे असे अर्थमंत्री?

Indian Budget 2025 Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारामन, 1 फेब्रुवारी रोजी देशाचा आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा अर्थमंत्रीबद्दल सांगणार आहे ज्याने एकदाही भारताचे अर्थसंकल्प म्हणजेच बजेट मांडले नाही.
Which Indian Finance Minister not presented budget for once
Which Indian Finance Minister not presented single budget in his working periodesakal
Updated on

Indian Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन, 1 फेब्रुवारी रोजी देशाचा आठवा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात सादर होणारा हा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. याआधी 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे, आणि देशभरातील नागरिक, उद्योगक्षेत्र, तसेच अर्थतज्ञ या अर्थसंकल्पावर कशी प्रतिक्रिया देणार, याबाबत उत्सुकता आहे.

यावेळच्या अर्थसंकल्पात जीडीपी वाढवण्यासह, सामान्य नागरिकांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. विशेषतः, करवाढीच्या स्लॅबमध्ये सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे बाजारात पैशाचा ओघ वाढून, अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल. याबाबत अनेक मीडिया रिपोर्ट्सनी दावा केला आहे. तसेच, सरकारकडून आयकरातील महत्त्वपूर्ण घोषणा अपेक्षित आहेत, जी जनतेला दिलासा देण्याची कामगिरी करेल.

कोणत्या अर्थमंत्रीने अर्थसंकल्प मांडला नाही?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कार्यकाळात आठव्यांदा अर्थसंकल्प सादर होणार आहे. परंतु, भारताच्या इतिहासात एक अर्थमंत्री असे होते, ज्यांनी कधीही अर्थसंकल्प सादर केला नाही. ते होते केसी नियोगी, जे 1948 मध्ये 35 दिवस अर्थमंत्री म्हणून कार्यरत होते. परंतु, स्वतंत्र भारताच्या इतिहासात ते एकमेव अर्थमंत्री होते ज्यांनी कधीही अर्थसंकल्प मांडला नाही.

भारतामध्ये अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा ब्रिटनच्या काळात सुरू झाली. 7 एप्रिल 1860 रोजी जेम्स विल्सन यांनी पहिल्यांदा भारतात अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर स्वातंत्र्यानंतरही ब्रिटनची परंपरा कायम ठेवण्यात आली, आणि आजही त्याच पद्धतीने अर्थसंकल्प सादर होतो.

Which Indian Finance Minister not presented budget for once
Stock Market Opening: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; निफ्टी 23,000च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

मोरारजी देसाईंचा विक्रम

अर्थमंत्री म्हणून मोरारजी देसाई यांनी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामध्ये आठ मुख्य अर्थसंकल्प आणि दोन अंतरिम अर्थसंकल्पांचा समावेश आहे. हे एक विक्रमच म्हणता येईल, जो इतक्या लवकर मोडणं कठीण आहे.

जीएसटी आणि पायाभूत सुविधांचा समावेश

2006 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी जीएसटीचा उल्लेख अर्थसंकल्पात प्रथम केला. याच अर्थसंकल्पात त्याने राष्ट्रीय एकल कर प्रणालीचा प्रस्ताव दिला. तसंच, पायाभूत सुविधांचा समावेश हा 1990 नंतरच अर्थसंकल्पात सुरू झाला, आणि आज त्या सुविधांचा अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण ठसा आहे.

Which Indian Finance Minister not presented budget for once
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेच्या निकषात बदल होणार? आदिती तटकरे म्हणाल्या...

महिलांच्या प्रश्नांवरील बदल

अर्थसंकल्पात महिलांसाठी स्थान मिळवण्याची प्रक्रिया खूप उशिरा सुरू झाली. 1980 नंतरच अर्थसंकल्पात महिलांच्या समस्यांचा उल्लेख होऊ लागला. याच बदलाने महिलांच्या समाजातील स्थान आणि आर्थिक पातळीवर वाढीला चालना दिली.

लाल पिशवीची परंपरा

अर्थसंकल्प सादर करतांना लाल पिशवी वापरण्याची परंपरा ब्रिटनपासून सुरू झाली. मात्र, भाजप सरकारने या परंपरेला समाप्त केले, आणि आज अर्थसंकल्प सादर करतांना त्याची जागा अधिक आधुनिक पद्धतीने घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com