Union Budget 2026 : भारताच्या भविष्याचा आराखडा; कौशल्य, आयुर्वेद आणि उद्योग यांचा समावेश अर्थसंकल्पात

Nirmala Sitharaman Union Budget : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ५३.५ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प २०२६-२७ सादर केला. कृषी, पर्यटन, उत्पादन, बायोफार्मा, वस्त्रोद्योग, रोजगार निर्मिती आणि कर सुधारणा यावर भर दिला, वैश्विक आव्हाने लक्षात घेतली.
Nirmala Sitharaman Union Budget

Nirmala Sitharaman Union Budget

sakal

Updated on

नवी दिल्ली : जागतिक आव्हानांची दखल घेत सातत्यपूर्ण प्रगतीचा आग्रह धरणारा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा ५३.५ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेच्या पटलावर मांडला. उत्पादनक्षेत्राला बूस्टर डोस देण्यात आला असून जागतिक डेटा सेंटरसाठी करामध्ये सवलत देण्यात आली आहे. कृषी आणि पर्यटन क्षेत्रासाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी आर्थिक शिस्तीला प्राधान्य देत लोकप्रिय घोषणा करणे टाळल्याचे दिसते. विशेष म्हणजे पाच राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही खबरदारी घेतल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. वायदे बाजारावरील करामध्ये सरकारने वाढ केल्याने बाजारामध्ये मात्र मोठी पडझड झाल्याचे दिसून येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com