Nivea vs Ponds: 'निव्हिया' आणि 'पॉन्ड्स' कंपन्यांमध्ये भांडण; हायकोर्टाने कोणाच्या बाजूने दिला निकाल?

Nivea vs Ponds: दिल्ली उच्च न्यायालयाने 'पॉन्ड्स' कंपनीला 'निव्हिया'च्या उत्पादनांशी तुलना करण्यास बंदी घातली आहे. दिल्ली आणि गुरुग्रामच्या अनेक मॉल्समध्ये दोन्ही उत्पादनांची तुलना करून 'पॉन्ड्स' विकले जात होते.
Nivea vs Ponds Popular moisturiser brands battle it out in a Delhi court
Nivea vs Ponds Popular moisturiser brands battle it out in a Delhi courtSakal

Nivea vs Ponds: दिल्ली उच्च न्यायालयाने 'पॉन्ड्स' कंपनीला 'निव्हिया'च्या उत्पादनांशी तुलना करण्यास बंदी घातली आहे. दिल्ली आणि गुरुग्रामच्या अनेक मॉल्समध्ये दोन्ही उत्पादनांची तुलना करून 'पॉन्ड्स' आपली उत्पादने विकत आहे. या मार्केटिंगवर किंवा जाहिरातींवर न्यायालयाने बंदी घातली आहे. अशी जाहिरात करणे म्हणजे दुसऱ्या कंपनीच्या उत्पादनांचा किंवा व्यवसायाचा अपमान करण्यासारखे आहे, असे न्यायालयाने 'पॉन्ड्स' बनवणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (एचयूएल) कंपनीला सांगितले आहे.

लाइव्ह लॉच्या अहवालानुसार, न्यायमूर्ती अनिश दयाल म्हणाले, "निव्हिया उत्पादनांची तुलना करणारी जाहिरात ही दिशाभूल करणारी आणि अपमानास्पद आहे."

निव्हिया उत्पादने बनवणारी कंपनी बीयर्सडॉर्फ एजीने 2021 मध्ये अर्ज दाखल केला होता. Beiersdorf AG ने 1925 मध्ये विशेष निळा रंग विकसित केल्याचा दावा केला. कंपनीने निळा रंग निव्हिया क्रीमसाठी विकसित केला होता. सध्याच्या प्रकरणात 'पॉन्ड्स' कंपनीचे विक्रेते या रंगाचे डबे दाखवून आपली उत्पादने विकत आहेत.

Nivea vs Ponds Popular moisturiser brands battle it out in a Delhi court
SEBI KYC: कोट्यवधी गुंतवणूकदारांना दिलासा; सेबीने KYC संबंधित नियम केले शिथिल, कोणाला होणार फायदा?

बीयर्सडॉर्फ एजी यांनी न्यायालयाला सांगितले की कंपनीला 2021 च्या आसपास या जाहिरातींची माहिती मिळाली. दिल्ली आणि गुरुग्राममधील अनेक मॉल्समध्ये एचयूएलचे प्रतिनिधी निव्हिया क्रीम आणि 'पॉन्ड्स सुपरलाइट जेल' सारख्या क्रीमच्या बॉक्सची तुलना करत असल्याची माहिती मिळाली. यासाठी निळ्या रंगाच्या बॉक्सवर कोणतेही स्टिकर किंवा कंपनीचे नाव नव्हते.

पॉन्ड्सने काय युक्तिवाद केला?

पॉन्ड्सने न्यायालयाला सांगितले की, ते निव्हाच्या ब्रँडिंगशिवाय फक्त 'ब्लू टब' वापरत होते. 'निव्हिया' कंपनीची निळ्या रंगावर मक्तेदारी नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. 'ब्लू टब' क्रीमपेक्षा पॉन्ड्स क्रीम 'कमी चिकट' असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Nivea vs Ponds Popular moisturiser brands battle it out in a Delhi court
Share Market: शेअर बाजारातील गोंधळावर निर्मला सीतारामन यांचे मोठे वक्तव्य, भाजपच्या कमबॅकवर काय म्हणाल्या?

निव्हियाने प्रतिक्रिया दिली की पॉन्ड्सने क्रीमच्या दोन भिन्न श्रेणींमध्ये तुलना केली आहे जी चुकीची आहे. 25 टक्के फॅट असलेल्या त्यांच्या 'हेवी ड्युटी प्रोडक्ट'ची तुलना पॉन्डच्या उत्पादनाशी केली जात असल्याचे निव्हियाने सांगितले. तर पॉन्ड्सच्या उत्पादनामध्ये 10 टक्के फॅट होते. मात्र, कोर्टात पॉन्ड्सचा युक्तिवाद टिकला नाही आणि निव्हियाच्या बाजूने निकाल लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com